सुधारक कुसुम शर्मा
१९४९ चा तो काळ होता. स्वातंत्र्य मिळून जेमतेम दोन वर्षे झाली होती. आता स्वराज्याचे सुराज्यात स्पान्तर करावयाचे म्हणून पुष्कळसे देशभक्त धडपड करीत होते. कुसुमताई शर्मा त्यांच्यांतल्याच एक होत्या. विचाराने त्या साम्यवादी होत्या; आणि जाज्वल्य देशाभिमान त्यांच्या प्रत्येक कृतीत सळसळत होता. त्या दिवशी नागपूरच्या भंगीपुयाच्या सर्व घरांतील लोक बाहेर येऊन निचितपणे बसले होते. त्यांना कुसुमताईंच्या अटकेची …